Saturday, July 5, 2025
Muktai Varta
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Muktai Varta
No Result
View All Result

नदीपात्रातील गाळ उपसा करणाऱ्या शेतकरी बांधव व कुंभार समाजाच्या वाहनांवर होत असलेल्या निषेधार्ह कारवाई तात्काळ थांबवा अन्यथा दि.१७ जून रोजी आंदोलनाचा इशारा

आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिला लेखी पत्राद्वारे इशारा 

Admin by Admin
June 14, 2022
in जळगाव, मुक्ताई वार्ता
0
नदीपात्रातील गाळ उपसा करणाऱ्या शेतकरी बांधव व कुंभार समाजाच्या वाहनांवर होत असलेल्या निषेधार्ह कारवाई तात्काळ थांबवा अन्यथा दि.१७ जून रोजी आंदोलनाचा इशारा
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
नदीपात्रातील गाळ उपसा करणाऱ्या शेतकरी बांधव व कुंभार समाजाच्या वाहनांवर होत असलेल्या निषेधार्ह कारवाई तात्काळ थांबवा अन्यथा दि.१७ जून रोजी आंदोलनाचा इशारा
आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिला लेखी पत्राद्वारे इशारा
मुक्ताईनगर :  सद्यस्थितीत शेतकरी राजा पेरणी पूर्व मशागती साठी जीवापाड मेहनत घेत आहे. तसेच नदीपात्रातील पाण्याची पातळी खालावली असल्याने या काळात नदीपात्रातील गाळ उपसा केला जातो. आणि शासनाचे धोरण असल्याने नदीपात्रातील गाळ उपसण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात येते जेणेकरून जास्तीत जास्त गाळ उपसा झाल्यास नदीपात्र असतील किंवा तलाव. बंधारे असतील यात खोलीकरण झाल्याने भूजल पातली वाढण्यास मदत होते. यासाठी शेतकरी बांधव जमिनीची पोत सुधारण्यासाठी तसेच कुंभार समाजातील अनेक कुटुंब जे उदर निर्वाहासाठी विटा बनविण्याचा पारंपारिक व्यवसाय करीत असतात त्या कुंभार समाजाकडूनही गाळ काढण्यात येतो.
            नदीपात्र गाळमुक्त करणे शासनाचे धोरण असल्याने तापी पूर्णा नदी पात्र गाळमुक्त करणेसाठी लघु पाटबंधारे विभाग रीतसर परवानगी देत असतांना रावेर व मुक्ताईनगर महसुली अधिकाऱ्यांतर्फे गाळ वाहतूक करणाऱ्या वाहनांवर मनमानी कारवाया सुरु असून शेतकरी व कुंभार समाजातील लोकांना अन्याय कारक दंडाचा भुर्दंड देण्यात येत आहे. हा प्रकार निषेधार्थ असून तात्काळ सदरील कारवाया थांबविण्यात याव्यात अन्यथा येत्या दि. १७ जून रोजी सकाळी ११ वाजेला आपले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल अशा इशाऱ्याचे लेखी पत्र आमदार चंद्रकांत पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ अभिजीत राऊत यांना दि.१४ जून रोजी दिले.
Previous Post

अनाथांना भिक्षा वाम मार्ग नव्हे , वारकरी शिक्षणातून ज्ञानाची दिक्षा देणारा अवलिया !

Next Post

मुक्ताईनगर तालुक्यातील ४८ सिमेंट काँक्रिट नाला बांध कामांसाठी १४ कोटी रु. निधी सह मंजूरी 

Admin

Admin

Next Post
मुक्ताईनगर व बोदवड नगरपंचायत हद्दीतील विविध विकास कामांसाठी १० कोटी रूपये निधी मंजुर

मुक्ताईनगर तालुक्यातील ४८ सिमेंट काँक्रिट नाला बांध कामांसाठी १४ कोटी रु. निधी सह मंजूरी 

संपादक : संतोष सुपडू मराठे

वार्ता संग्रह

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group