धानोरी ता. बोदवड येथील शेकडो कार्यकर्त्यांचा आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शिवसेनेत जाहीर प्रवेश !
संत मुक्ताईनगर : येथील शिवनेरी या निवासस्थानी धानोरी ता. बोदवड येथील शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आ.पाटील यांच्या हस्ते शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
यांनी केला जाहीर प्रवेश
युवराज लीलाधर पाटील, जितेंद्र रमेश पाटील, शंकर मधुकर पाटील, मुकेश पंडित पाटील, गजानन दिनकर अवचारे, दीपक संतोष पाटील, कडू उखर्डू मोरे, विजय कडू पाटील, विजय सखाराम मोरे, चेतन गणेश पाटील , रामकृष्ण काशिनाथ पवार, ज्ञानेश्वर गुलाब गायकवाड, प्रल्हाद नारायण पाटील, सूरज विजय मोरे, गोपाळ अर्जुन पवार, अविनाश कैलास अवचारे, दिनेश संजय मोरे, सुनील गणेरकर, विवेक विलास नप्ते, कैलास गायकवाड, सुरेश लक्ष्मण पाटील आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश घेतला.
प्रसंगी आमदार चंद्रकांत पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, गोपाळ सोनवणे , शहर प्रमुख राजेंद्र हिवराळे, गणेश टोंगे आदींची उपस्थिती होती.