धक्कादायक : तरुणाची हत्या करून मृतदेह नदीपात्रात फेकला, अवघ्या काही तासात आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश !
मुक्ताईनगरमधून हत्येची एक खळबळजनक घटना समोर आली आहे. 19 जुलै 2024 रोजी रात्री 1:30 वाजेच्या सुमरास सचिन साहेबराव पाटील, राहणार आसोदा रेल्वे गेट जवळ, जळगाव यांनी समक्ष येऊन कळविले की, त्यांचा भाऊ नितीन साहेबराव पाटील (वय 26), हा त्याचा एक मित्र वैभव गोकुळ कोळी, राहणार आसोदा रेल्वे गेट जवळ, जळगाव यांचे सोबत डोलारखेडा फाटा येथे उसनवार दिलेले पैसे घेण्यासाठी आला होता. त्या ठिकाणी वैभव गोकुळ कोळी आणि संतोष भागवत कठोरे, राहणार बोदवड, तालुका मुक्ताईनगर यांनी मिळून उसनवार पैशाच्या वादातून नितीन पाटील यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांचा खुन केला आहे. आणि त्याचे प्रेत पूर्णा नदीच्या पात्रात टाकून दिले होते. त्यावरून आवश्यक त्या नोंदी घेऊन त्यांची माहिती सर्व वरिष्ठांना देऊन वरिष्ठांचे मार्गदर्शन व सूचनेप्रमाणे संशयित आरोपी आणि मयतांचा प्रेताचा शोध सुरू करण्यात आला. मयत नितीन पाटील यांचे प्रेताचा बोटी आणि पाणबुड्याचा सहाय्याने पूर्ण नदीच्या पात्रात शोध घेतला असता प्रेत मिळून आले. मुक्ताईनगर पोलिसांनी आरोपी वैभव कोळी आणि संतोष कठोरे यांना शिताफीने ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक नागेश मोहिते करीत आहे.
सदरचा गुन्हा डॉ.महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक, जळगांव, अशोक नखाते अप्पर पोलीस अधीक्षक जळगाव, राजकुमार शिंदे उपविभागीय पोलीस अधिकारी मुक्ताईनगर यांचे मार्गदर्शन आणि सूचनेनुसार पोलीस निरीक्षक बबन आव्हाड स्थानिक गुन्हे शाखा जळगाव, मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नागेश मोहिते, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे, पोलीस हवालदार लीलाधर भोई, राजकुमार चव्हाण, पोलीस नाईक मोतीलाल बोरसे, विजय पढार, प्रदीप इंगळे, पोलीस कॉन्स्टेबल दिगंबर कोळी, प्रशांत चौधरी, रवींद्र धनगर, सागर सावे, अनिल देवरे, प्रदीप देशमुख, विशाल पवार, ईश्वर पाटील, चालक सहा.फौ. शेख यांनी केलेली आहे.