Sunday, May 25, 2025
Muktai Varta
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Muktai Varta
No Result
View All Result

धक्कादायक : ओझरखेड धरण पाणलोट बुडीत क्षेत्रात विनापरवाना क्रशर मशीन

महसूल प्रशासन अर्थपूर्ण कुंभकर्ण झोपेत* : डॉ.विवेक सोनवणे

Admin by Admin
August 9, 2024
in जळगाव
0
धक्कादायक : ओझरखेड धरण पाणलोट बुडीत क्षेत्रात विनापरवाना क्रशर मशीन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

*धक्कादायक : ओझरखेड धरण पाणलोट बुडीत क्षेत्रात विनापरवाना क्रशर मशीन*

*महसूल प्रशासन अर्थपूर्ण कुंभकर्ण झोपेत* : डॉ.विवेक सोनवणे

मुक्ताईनगर :- वरणगाव तळवेल उपसा सिंचन योजनेअंतर्गत ओझरखेड धरणाच्या पाणलोट बुडीत क्षेत्रात विनापरवाना,अवैधरित्या क्रशर मशीन सुरू असल्याची तक्रार स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ.विवेक सोनवणे यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे. वरणगाव तडवेल उपसा सिंचन योजनेअंतर्गत ओझरखेड ते माळेगाव धरणाच्या बाहेरील बाजूस ४ किलोमीटरच्या सुरू असलेल्या १४ कोटी ५६ लाखांच्या निकृष्ट डब्लूबीएम रस्त्यासाठी लागणारी गिट्टी धरण क्षेत्रात तालुक्यासह जिल्हा प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता विनापरवाना अवैधरित्या सुरू असून याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना माहिती अधिकार अर्जात माहिती मागितली असता उपसा सिंचन बांधकाम विभागाकडून दिशाभूल करणारी माहिती देण्यात आली सदर विनापरवाना गिट्टी मशीन बाबत तालुका प्रशासनासह जिल्हा प्रशासनाकडे माहिती मागितली असता सदर धरण क्षेत्रात गिट्टी मशीन बाबत कोणतीही परवानगी घेण्यात आली नसून संबंधित विभागाने कोणताही पत्रव्यवहार केला नसल्याचे कळविण्यात आले व त्यामुळे संबंधित ठेकेदाराने तात्काळ मशीन तिथून हलवले परंतु आज रोजी धरण क्षेत्रात गिट्टी मशीन जोमात सुरू आहे. संबंधित ठेकेदाराने अवैधरित्या विनापरवाना सुरू केलेल्या गिट्टी क्रशर मशीन बाबत उपसा सिंचन विभागाचे अधिकारी मूंग गिळून गप्प का असा सवाल परिसरातील नागरिक विचारत आहे. उपसा सिंचन बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवला जात आहे तसेच धरण क्षेत्रात संबंधित ठेकेदाराकडून अवैधरित्या ब्लास्टिंगही सुरू असल्याचे परिसरातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यावरून उपसा सिंचन बांधकाम विभागाचा भोंगळ व भ्रष्ट कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून महसूल प्रशासनाने उपसा सिंचन बांधकाम विभागाच्या या भोंगळ व भ्रष्ट कारभारावर कठोरात कठोर कार्यवाही करून शासनाचा बुडवलेला महसूल दंडाच्या व्याजासह वसूल करण्यात यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.विवेक सोनवणे यांनी विभागीय आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे

Tags: Bhusawal NewsJalgaon NewsLatest Marathi NewsMuktai vartaMuktai varta newsमुक्ताईनगर
Previous Post

मुक्ताईनगर जवळ एस टी बसचा अपघात, ८ जण जखमी  आमदारांची टीम धावली मदतीला ! 

Next Post

संत मुक्ताई पालखी आगमन सोहळा, दिमाखात संपन्न

Admin

Admin

Next Post
संत मुक्ताई पालखी आगमन सोहळा, दिमाखात संपन्न

संत मुक्ताई पालखी आगमन सोहळा, दिमाखात संपन्न

संपादक : संतोष सुपडू मराठे

वार्ता संग्रह

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group