ते वृत्त खोडसाळ व दिशाभूल करणारे – आमदार चंद्रकांत पाटील
मुक्ताईनगर : दै. दिव्य मराठी रावेर लोकप्रतिनिधीने आमदार चंद्रकांत पाटील यांची अधिकृतरित्या कुठलीही प्रतिक्रिया न घेता किंवा संपर्क न साधता केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये गैरसमज निर्माण होईल असे वृत्त प्रसिद्ध केल्याने आमदार पाटील यांनी यासंदर्भात आज दि.६ नोव्हेंबर रोजी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेवून खोडसाळ वृत्त छापल्या बद्दल निषेध व्यक्त करून केळी उत्पादक शेतकरी नाराज होतील त्यांचे नुकसान होइल अशी कुठलीही त्यांची भूमिका नसल्याचे त्यांनी जाहीर केले.
5 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील एका वृत्तपत्रामध्ये ( दिव्य मराठी) केळी पीक विम्याच्या चौकशीसाठी एसपींना भेटू अशा मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाले होते सदरच्या बातमीमध्ये आमदार चंद्रकांत पाटील यांना कोणतीही माहिती न विचारता वृत्त प्रसिद्ध झाले होते सदर वृत्ताचा आमदार चंद्रकांत पाटील यांनी रविवारी मुक्ताईनगर मध्ये त्यांच्या निवासस्थानी सायंकाळी पत्रकार परिषद घेत निषेध व्यक्त केला. व सदरचे वृत्त हे दिशाभूल करणारे व चुकीचे असल्याची माहिती चुकीची असल्याचे आमदारांनी सांगितले .
याबाबत बोलताना ते पुढे म्हणाले की, काल दि.५ रोजी दै. दिव्य मराठी या दैनिकात केळी फळपीक विमा योजना राबवताना रावेर मुक्ताईनगर यावल तालुक्यात अनेक क्षेत्रात शेतकऱ्यांनी लागवड नसताना त्या क्षेत्राचा विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून काढणे तसेच शेतमालकाला डावलून दुसऱ्याच्या नावाने विमा हप्ता भरून नुकसानी पोटी मिळणारी रक्कम हडपण्याच्या तक्रारी आल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती . त्यात मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील हे यासंदर्भात जिल्हाधिकारी प्रधान सचिवांकडे चौकशीची मागणी करणार असल्याचे चुकीचे व दिशाभूल करणारे वृत्त छापण्यात आले होते वास्तविक अशा कोणत्याही प्रकारचे वक्तव्य आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले नसून या चुकीच्या बातमीचे त्यांनी खंडन केले आहे , यावेळी बोलताना ते म्हणाले की केळी पिकावर आढळून येणाऱ्या सीएमव्ही मुळे होणाऱ्या केळी पिकाचा मोबदला मिळण्यासाठी प्रयत्न केला तसेच तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोबदला मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले होते इतकेच नव्हे तर इ पिक पाहणी ऑनलाइन पद्धतीने करताना अनेक अडचणी येत होत्या तसेच सदरचे पीक पेरे नोंदवणे ही अतिशय अडचणीचे काम होते 31 ऑक्टोबर पर्यंत अनेक शेतकरी पिक विमा पासून वंचित राहणार होते त्याबाबत अनेक शेतकऱ्यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे तक्रारी केल्यानंतर त्यांनी थेट कृषिमंत्री व महसूल मंत्री, पालकमंत्री तसेच जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून इ पीक पाहणी बंधनकारक नसून त्याची मुदतही वाढवण्यात आली होती एका बाजूने आमदार चंद्रकांत पाटील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रयत्न करीत असताना त्या शेतकऱ्यांच्याच विरोधात वक्तव्य कसे करणार असा सवाल आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे दि.५ रोजी दैनिक दिव्य मराठी मध्ये केळी पिक विमा च्या चौकशीसाठी एसपींना भेटू या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाले होते या वृत्ताचे मी पत्रकार परिषदेत खंडन करीत आहे असे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे त्या बातमीवर केळी उत्पादक शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नये असे आवाहनही आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.