तिर्थक्षेत्री संत मुक्ताईनगर येथे श्री.गोपाळ कृष्ण प्राणप्रतिष्ठा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न !
संत मुक्ताईनगर : तिर्थक्षेत्री पायी व दर्शन वारीसाठी येणाऱ्या भाविक व पालखी सोहळे यांच्या वारीची सांगता गोपाळ पुरात प्रदक्षिणा घातल्याशिवाय होतच नाही. त्यामुळे या संत भूमीत गोपाळ पूर असावे अशा ध्येयाने येथे भव्य असे श्री गोपाळ कृष्णाचे भव्य मंदिर उभारले गेले असून या मंदिरात श्री गोपाळ कृष्ण भगवंताची सुंदर अशा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा वेदोक्त मंत्रपुष्पांजली सेवेत पार पडली. हा सोहळा साधू महंत व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला असून या सोहळ्यानिमित्त पंचदिनी कथा कीर्तन व प्रवचन सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले असून श्रीमद् भागवत दशम स्कंद कथा ह भ प संदीप महाराज खामनीकर यांच्या मधुर वाणीतून वाचन होणार आहे.
यावेळी महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज, रामभारती महाराज,वासुदेवानंद सरस्वती महाराज, संत मुक्ताई देवस्थान अध्यक्ष ॲड रविंद्र पाटील, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सौभाग्यवती यामिणीताई पाटील, कन्या संजनाताई पाटील, काँगेस प्रदेश उपाध्यक्ष डॉ जगदीश पाटील, माजी जिल्हा बँक अध्यक्षा रोहिणीताई खडसे, संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र हरणे महाराज, रुख्मिणी माता मंदिर समिती विश्वस्त सर्जेराव देशमुख, माजी बाजार समिती अध्यक्ष निवृत्ती पाटील, ईश्वर रहाणे, प्रशांत महाजन, ज्योतीताई महाजन, कल्पनाताई हरणे, किरण महाजन , कल्याण पाटील, गणेश आढाव , ज्ञानेश्वर हरणे आदींची उपस्थिती होती.