तापमानाचा पारा घसरल्याने शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई : आमदार चंद्रकांत पाटील
संत मुक्ताईनगर : जानेवारी महिन्याच्या सुरवातीला सलग ३ दिवस ८ डिग्री कमी तापमानामुळे सर्व शेतकऱ्यांना फळ पिक विम्याचा प्रति हेक्टर मिळणार रु.२६,५००/- लाभ मिळणार असल्याची माहिती आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली. यासंदर्भात दि.१८ जानेवारी २०२३ बुधवार रोजी काही शेतकऱ्यांसह विमा कंपनीच्या प्रतिनिधींची बैठक आमदारांच्या निवास स्थानी पार पडली .त्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांना पुर्नरचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना अंतर्गत नुकसान भरपाई चा लाभ मिळणार आहे.
पुर्नरचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना २०२२-२३ (आंबिया बहार)* अंतर्गत दि.१३ जानेवारी २०२३ पर्यंतच्या महावेध माहिती (डेटा) नुसार जळगांव जिल्ह्यातील ४९ महसूल मंडळात सलग ३ दिवस किमान तापमान ८ डिग्री सेल्सियस व त्यापेक्षा कमी राहिल्याने; जिल्ह्यातील केळीला तापमानाचा फटका बसून शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. सदर शेतकऱ्यांना प्रति हेक्टर रु.२६,५००/- प्रमाणे नुकसान भरपाई मंजुर होणार आहे.
पुर्नरचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना २०२२-२३ (आंबिया बहार) अंतर्गत दि.१३ जानेवारी २०२३ पर्यंत कमी तापमानामुळे झालेल्या नुकसान भरपाईस पात्र रावेर, मुक्ताईनगर, जामनेर, बोदवड, यावल विभागातील तालुका व महसूल मंडळे खालील प्रमाणे.
1.भुसावळ : पिंपळगांव
2.बोदवड : बोदवड, करंजी, नाडगांव
3.जामनेर : जामनेर, मालदाभाडी, नेरी
4.मुक्ताईनगर : अंतुर्ली, घोडसगांव, कुऱ्हा
5.रावेर : खानापूर, खिर्डी, खिरोदा, निंभोरा, रावेर, सावदा
6.यावल : बामणोद, भालोद, फैजपूर, किनगांव, साखळी, यावल