संत मुक्ताई अभंग
पंढरपूर महात्म्यपर
जयालागी योगी शीणती साधनी।
तो हा चक्रपा
णी पंढरिये ॥ १॥

युगे अठ्ठाविस उभा विटेवरी ।
कर कटा वरी ठेवोनिया ।।२।।
दक्षिण वाहणी भिमा प्राणिया उद्धार ।
स्नाने नारी नर मुक्त होती ।।३।।
संत मुकूटमणी पुंडलिकराव ।
दरूशने ठाव वैकुंठाचा ।।४।।
निवृत्ती ज्ञानदेव सोपान चांगया।
मुक्ताई तथा ओवाळती ।।५।।