गारबर्डी येथे पुरात अडकलेल्या ९ जणांसाठी एक कॉल वर धावून गेला युवासेना जिल्हाप्रमुख पंकज राणे
आमदार चंद्रकांत पाटील यांनी राणे यांचा सत्कार करून समाजसेवेप्रती कर्तव्य दक्ष असावे तर या तरुणा सारखे असे गौरवोद्गार प्रसंगी काढले
मुक्ताईनगर : रावेर तालुक्यातील सुकी नदी पात्रात अचानक पुर स्थिती उद्भवल्याने गारबर्डी धरण परिसरात पर्यटनासाठी गेलेले मुक्ताईनगर तालुक्यातील ९ तरुण अटकले. त्यांनी मदतीसाठी परिसरातील गावकरी यांचेकडे साद मागितली व कोथळी ता.मुक्ताईनगर येथील रहिवासी युवासेना जिल्हाप्रमुख पंकज राणे यांना देखील भ्रमणध्वनी वरून पुरात अडकल्याची माहिती दिली. आणि राणे यांनी लागलीच घटना स्थळा कडे धाव घेतली. व रावेर तालुक्यातील सुकी नदी पात्रात अडकलेल्या 9 युवकांना स्वतः च्या जीवाची पर्वा न करता सुखरूप बाहेर काढण्यास मदत करणाऱ्या पथकात पोलीस प्रशासन, पाल येथील नागरिक यांच्या समवेत मदत कार्यात भाग घेवून युवा सेना जिल्हा प्रमुख पंकज राणे यांनी मदत मोलाची मदत केली. यावेळी ते मध्यरात्री पर्यंत तिथेच थांबून होते. ही बाब खूप अभिमानास्पद असल्याने सामाजिक कार्यकर्ता हा सुख दुःखात धावून जाणारा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण पंकज राणे यांनी दिल्याने आमदार चंद्रकांत पाटील राणे यांच्या कोथळी येथे निवास स्थानी जाऊन सत्कार केला,
प्रसंगी सोबत शिवसेना पदाधिकारी, शिवसेना नगरसेवक, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ आदी उपस्थित होते.