Friday, May 9, 2025
Muktai Varta
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Muktai Varta
No Result
View All Result

गंगा दशहरा सप्ताह निमीत्त… संत मुक्ताई घाटावर श्री स्वामी समर्थ सेवेकऱ्यांनी राबविली स्वच्छ्ता मोहीम ! 

Admin by Admin
May 25, 2023
in मुक्ताई वार्ता
0
गंगा दशहरा सप्ताह निमीत्त… संत मुक्ताई घाटावर श्री स्वामी समर्थ सेवेकऱ्यांनी राबविली स्वच्छ्ता मोहीम ! 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
गंगा दशहरा सप्ताह निमीत्त…
संत मुक्ताई घाटावर श्री स्वामी समर्थ सेवेकऱ्यांनी राबविली स्वच्छ्ता मोहीम !
On the occasion of Ganga Dussehra week…
Cleanliness campaign carried out by the servants of Shri Swami Samarth at Sant Muktai Ghat!
श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणीत) मार्फत पर्यावरण प्रकृती विभाग अंतर्गत नदी स्वच्छता अभियान परमपूज्य गुरूमाऊली श्री अण्णासाहेब मोरे यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली प्रत्येक सेवा केंद्राच्या माध्यमातून  सर्व भाविक-सेवेकऱ्यांना सोबत घेऊन गंगा दशहरा सप्ताह निमित्त दि.२० मे ते ३० मे २०२३ दरम्यान नदी, तलाव, घाट स्वच्छता करण्याचे व कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावण्याचे तसेच अडगळीत पडलेल्या देवी देवतांचे फोटो , मुर्त्या यांचा योग्य तो विधिवत मानसन्मान करून स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे.यासाठी जल प्रदुषण करणार नाही याची प्रतिज्ञा (शपथ) देखील दिली जात आहे.
     दरम्यान याच धर्तीवर श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक व बालविकास सेवा केंद्र , तापी पूर्णा परिसर तर्फे नदी व घाट परिसरात आज दि.२५ मे २०२३ रोजी गुरुवारी आदिशक्ती संत मुक्ताई मंदिर श्री क्षेत्र मुक्ताईनगर परिसरातील तापी पूर्णा नदी वर असलेल्या मुक्ताई  घाटावर सेवेकरी परिवारातर्फे स्वच्छता राबविण्यात आली. सेवेकरी वर्गा तर्फे करण्यात आलेल्या स्वच्छ्ता मोहिमेत घाटावर फोटो ,तुटलेल्या काचा, बांगड्या , व इतर प्रचंड झालेल्या घाणीचे संकलन करून स्वच्छता करण्यात आली.यावेळी सेवेकरी बांधवांतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले की, नदीचे पाणी प्रदुषित होऊ नये म्हणून
१) औद्योगिक हानिकारक रसायने, विषारी पदार्थ आणि इतर धोकादायक कचरा नदीच्या पाण्यात सोडू नये.
२)निर्माल्य, पवित्र मूर्ती, प्लास्टिक कचरा नदी, तलाव वा धरणात टाकू नका.
३)कीटकनाशक नदीच्या पाण्यात सोडू नये.
४)प्लास्टिकच्या पिशव्या नदीच्या पाण्यात जाणार नाही याची काळजी घेणे घरगुती सांडपाणी STP प्रक्रिया (स्वच्छ) करून नदीत सोडावे.
असे आवाहन करण्यात आलेले आहे.
*गंगा दशहरा सप्ताह निमीत्त…*
*संत मुक्ताई घाटावर श्री स्वामी समर्थ सेवेकऱ्यांनी राबविली स्वच्छ्ता मोहीम !*
अवघ्या काही तासात मुक्ताई घाट झाले चकाचक
*बघा व्हिडिओ वृत्तांत*
https://youtu.be/xRrML5Ghupo
Tags: Jalgaon NewsLatest Marathi NewsMuktainagar News
Previous Post

प्रक्षाळ पुजेने संत मुक्ताई ७२६ व्या अंतर्धान सोहळ्याची सांगता,  भाविकांनी संत मुक्ताईच्या मूर्तीस लावले  लिंबू , साखर

Next Post

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांनी मुक्ताईनगर बोदवड नगरपंचायतीसाठी ८.६० कोटी मंजूर !

Admin

Admin

Next Post
आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांनी मुक्ताईनगर बोदवड नगरपंचायतीसाठी ८.६० कोटी मंजूर !

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांनी मुक्ताईनगर बोदवड नगरपंचायतीसाठी ८.६० कोटी मंजूर !

संपादक : संतोष सुपडू मराठे

वार्ता संग्रह

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group