खडसेंना धक्का : जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळाची कार्यकारिणी बरखास्त !
मुख्य प्रशासक आ.मंगेश चव्हाण, प्रशासक म्हणून आ.चंद्रकांत पाटील, अशोक कांडेलकर व इतरांची नियुक्ती
जळगाव : माजी मंत्री आ.एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे चेअरमन असलेल्या जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळाच्या कारभाराबाबत अनेक तक्रारी असल्याने दूध संघात महा घोटाळा झाल्याचे आरोप झाले होते. तसेच वैधानिक मुदत संपल्यावरही तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या पाठबळाने कुठलीही कारवाई झालेली नव्हती. कारभारी सदरील संचालक मंडळच होते. परंतु राज्यात नवीन सरकार स्थापन होताच त्या तक्रारींच्या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी आज दि.२८ जुलै २०२२ रोजी दिलेल्या निर्देशानुसार जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळाची कार्यकारिणी बरखास्त करून ११ जणांची नवीन प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे.
प्रशासक नियुक्ती खालील प्रमाणे :
१)आ.मंगेश चव्हाण (चाळीसगाव) “मुख्य प्रशासक”
२)आ.चंद्रकांत पाटील(मुक्ताईनगर) “प्रशासक”
३)माजी आ.चंद्रकांत सोनवणे(चोपडा) “प्रशासक”
४)अजय भोळे(भुसावळ) “प्रशासक”
५)अमोल चिमणराव पाटील(पारोळा) “प्रशासक”
६)अरविंद भगवान देशमुख(जामनेर) “प्रशासक”
७)राजेंद्र वाडीलाल राठोड(चाळीसगाव) “प्रशासक”
८)अशोक नामदेव कांडेलकर (मुक्ताईनगर) “प्रशासक”
९)गजानन पुंडलिक पाटील(धरणगाव) “प्रशासक”
१०)अमोल पंडितराव शिंदे(पाचोरा) “प्रशासक”
११)विकास पंडित पाटील(भडगाव) “प्रशासक”
अशा एकूण ११ जणांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.
खडसेंना धक्का :
दरम्यान, माजी मंत्री एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे या जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाच्या कार्यकारिणीत चेअरमन तसेच संचालक मंडळात त्यांचे वर्चस्व असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्राप्त तक्रारींची तात्काळ दखल घेवून संचालक मंडळ बरखास्त करून एक प्रकारे खडसेंना धक्का दिल्याचे बोलले जात आहे.****””***”****************************जिल्हा दूध संघाचे माजी मंत्री माजी सुरक्षा अधिकारी नगराज पाटील यांनी जिल्हा दूध संघाच्या कारभारातील अनियमितता तसेच या दूध संघात राबविण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याची तक्रार सरकारकडे करण्यात आली होती. मात्र गेल्या काळातील महाविकास आघाडी सरकारकडून त्याची कुठलीही दखल घेण्यात आलेली नव्हती.