कृषी विभागामार्फत बनविलेल्या वनराई बंधाऱ्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे हस्ते जलपूजन !

मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यातील बोदवड धामणगाव दरम्यान महाराष्ट्र शासन स्तरावरील कृषी विभाग मार्फत बनविण्यात वनराई बंधारा चे जलपूजन आमदार चंद्रकांत पाटील यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी आमदार पाटील यांनी बोलताना सांगितले की,अश्या प्रकारचे वनराई बंधारे गावो गावी चे नदी नाल्यांवर वर प्रस्तावित करावे त्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करणे साठी तसेच प्रस्ताव करतांना आवश्यक ती मदत करण्यास आम्ही तयार आहोत जेणे करून भूजल पातळीत वाढ होईल त्यामुळे शेतकरी बांधवांना याचा खूप फायदा होईल यासाठी वनराई बंधारे जास्तीत जास्त संख्येत तयार करण्याच्या सूचना आमदार पाटील यांनी कृषी विभागाला दिल्या.
या वेळी तालुका कृषी अधिकारी अभिनव माळी , तालुका प्रमुख छोटुभाऊ भोई, उपतालुकप्रमुख नवनीत पाटील, शहर प्रमुख पंकज पांडव, सतीश नागरे, सो सेल विभागप्रमुख दिपक वाघ सर, कृषी पर्यवेक्षक कृषी सहाय्यक अर्चना इंगळे , निलेश पाटील, पंकज पाटील, सुनील उधळकर, योगेश ठाकरे आदी मान्यवर कार्यकर्ते पदाधिकारी व शेतकरी बांधव तसेच असंख्य नागरिक उपस्थित होते.
