कुऱ्हा पोलिस स्टेशन निर्मितीचा मोठा निर्णय ;
आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याला आले यश !
जळगाव जिल्ह्यातील दहा पोलिस ठाण्यांचे विभाजन पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांची माहिती
मुक्ताईनगर : जिल्ह्यातील दहा पोलिस ठाण्यांचे विभाजन करण्याचा निर्णय घेतला असून, यातून नवीन स्थानके वा दूरक्षेत्रांची निर्मिती करण्यात येणार आहे. याबाबत सोमवारी (ता. (१३) पोलिस अधीक्षक कार्यालयात बैठक घेऊन प्रस्तावासंदर्भात चर्चा करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी दिली.
दरम्यान मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा भागातील सुमारे ३३ गावे ही अतिशय दुर्गम भागातील तसेच सातपुडा पर्वत रांगा परिसरातील वढोदा वन विभाग क्षेत्र व महाराष्ट्र राज्य मध्यप्रदेश सीमावर्ती भागातील असल्याने तसेच तालुका मुख्यालय पासून या गावांचे अंतर ६० ते ७० किमी असल्याने नागरिकांना दैनंदिन कामकाजासाठी किंवा सुरक्षा पुरविणे या कामी मुक्ताईनगर पोलिस स्टेशन लांब पल्ल्याचे होत असल्याने या भागात वन्य जीव तस्करी तसेच गुन्हेगारी वाढत असल्याने आमदार चंद्रकांत पाटील यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांचेसह वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचेशी मुक्ताईनगर शासकीय विश्रामगृहावर सविस्तर चर्चा करून मुक्ताईनगर पोलिस स्टेशन चे विभाजन करून कुऱ्हा पोलिस स्टेशन ची स्वतंत्र रित्या निर्मिती करण्याची मागणी केली होती. यानंतर विद्यमान गृहमंत्री ना देवेंद्र जी फडणवीस यांच्याकडे कडे देखील पाठपुरावा सुरू ठेवलेला असून या पाठ पुरव्याला प्रचंड यश आलेले तसेच पोलिस प्रशासनाने कुऱ्हा पोलिस स्टेशन ची निर्मिती करण्याचा निर्णय घेतलेला तासेचातदर संघातील ऐनपुर स्वतंत्र पोलिस स्टेशन निर्मितीची देखील प्रक्रिया सुरू झालेली आहे. यासंदर्भात थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांनीच माहिती दिल्याने यावर शिक्का मोर्तब झालेले आहे.
या पोलिस ठाण्यांचे होणार विभाजन :
■ अमळनेर पोलिस ठाण्याचे विभाजन करून शहर आणि ग्रामीण, असे दोन पोलिस ठाणे होणार आहेत. जळगावातील एमआयडीसी पोलिस ठाण्याचे विभाजन होणार असून, म्हसावद येथे नवीन पोलिस ठाणे, जळगाव शहर विभाजन होऊन छत्रपती शिवाजी महाराजनगरसाठी नवीन ठाणे कार्यरत होणार आहे. पाचोऱ्याचे विभाजन होऊन नगरदेवळा येथे नवीन ठाणे होणार आहे, तर पारोळ्याचे विभाजन होऊन तामसवाडी येथे पोलिस ठाणे होणार आहे. मुक्ताईनगर पोलिस ठाण्याचे विभाजन होऊन कुन्हा काकोडा, तर पहूरचे विभाजन होऊन शेंदुर्णी येथे नवीन ठाणे होणार आहे. यासोबत भडगावचे विभाजन होऊन गाव येथे पोलिस दूरक्षेत्र होणार आहे. निंभोऱ्याचे विभाजन होऊन ऐनपूर येथे, तर मेहुणबाऱ्याचे विभाजन होऊन पिलखोड येथे पोलिस दूरक्षेत्र होणार आहे.