किरण बकालेला बडतर्फ करून अटक करा – मराठा समाज आक्रमक
मुक्ताईनगर मागणीसाठी साखळी उपोषण
मुक्ताईनगर : मराठा समाज व समजातील महिलाबद्दल घृणास्पद वक्तव्य करणाऱ्या नीच हरामखोर तत्कालीन स्थानिक गुन्हे शाखा जळगाव चा पोलिस निरीक्षक किरण बकाले याला तात्काळ बडतर्फ करन अटक करावी तसेच त्याच्या संपत्तीची चौकशी करून मालमत्तेला टाच लावण्यात यावी अशा प्रमुख मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झालेला असून याच अनुषंगाने मुक्ताईनगर सकल मराठा समाजातर्फे येथील तहसील कार्यालय आवारात एक दिवसीय साखळी उपोषण करण्यात आले.
यावेळी आमदार चंद्रकांत पाटील , मराठा समाज तालुका अध्यक्ष अनंतराव देशमुख, तालुका उपाध्यक्ष माणिकराव पाटील, सचिव यु डी पाटील,इजि संदिप बागुल, ईश्वर राहणे, दिनेश कदम, दिलीप पाटील सर साहेबराव पाटील, रवि दांडगे, लीलाधर पाटील, कृष्णा पाटील, सदाशिव पाटील, अरुण चौधरी, निवृत्ती भड, मुस्लिम मनियार बिरदरीचे जिल्हाउपाध्यक्ष हकीम चौधरी ,शिवसेनेचे तालुकाप्रमुख छोटु भोई, छावा संघटनेचे अध्यक्ष सचिन मालवणकर, प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष राजेंद्र सांगळकर, मनसे तालुकाध्यक्ष मधुकर भोई, भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रफुल्ल जावरे, साहेबराव पाटील नगरसेवक राजेंद्र हिवराळे, नगरसेवक बबलु कोळी, नगरसेवक संतोष मराठे, नगरसेवक पियुष महाजन, नगरसेवक निलेश शिरसाट, नगरसेवक वसंत भलभले, विक्रम हिरोळे, आदींसह शेकडो मराठा समाजासह इतर सर्वच जाती धर्मातील नागरिकांनी साखळी उपोषणात सहभागी होत आंदोलनाला पाठिंबा दिला.
