काल्याचे किर्तन : ह.भ.प.चैतन्य महाराज देगलूरकर
भगवंताची चक्रीवर्तिनी कृपा हिच आईसाहेब मुक्ताई !
मुक्ताईनगर :
पाहाती गौळणी । तंव पालथी दुधाणी ॥१॥
म्हणती नंदाचिया पोरें । आजि चोरी केली खरें ॥ध्रु.॥
त्याविण हे नासी । नव्हे दुसरिया ऐसी ॥२॥
सवें तुका मेळा । त्याणें अगुणा आणिला ॥३॥
जगत गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा काल्याच्या प्रसंगातील अत्यंत प्रसिद्ध आणि महत्त्वाचा असा अभंग आहे.या अभंगांमधून तुकोबारायांनी गोकुळात भगवंताच्या संबंधात घडलेली एक चोरीची घटना आपल्या समोर मांडत दुधाची सर्व भांडी पालथी घालून ठेवलेली गौळणीनी पाहिली ।।1।।
त्या म्हणाल्या, नंदाच्या। मुलाचे हे काम आहे. त्यानेच ही चोरी केलि ।।ध्रु।।
दुधाची अशी नासाड़ी दूसरे कुणी करणार नाही ।।।2।।
तुकाराम महाराज म्हणतात, हां मेला तुक्या त्यांच्याबरोबर होता, त्यानेच निर्गुण अश्या ईश्वराला बरोबर आणले असले पाहिजे ।।3।।.
असा भक्ती पूर्ण भाव येथे मांडलेले असल्याचे काल्याच्या कीर्तनातून निरूपण करताना आपल्या अमृततुल्य वाणीतून ह.भ.प.चैतन्य महाराज देगलूरकर सुश्राव्य असे काल्याचे किर्तन करून श्रोते व भाविकांना मंत्रमुग्ध केले होते.मुक्ताईनगर येथील तिर्थक्षेत्र संत मुक्ताई देवस्थान येथे श्री सद्गुरू धुंडा महाराज देगलूकर सेवा समिती,पंढरपूर व श्री संत मुक्ताई संस्थान ,मुक्ताईनगर समाधीस्थळ द्वारा आयोजित ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण – निरूपण व भव्य कीर्तन महोत्सवाच्या शेवटच्या दिवसाची म्हणजेच काल्याच्या किर्तनाची सेवा दि.४ जानेवारी २०२३ रोजी मोठ्या उत्साहात पार पडली.
पुढे आपल्या वाक पुष्पातून बोलतांना त्यांनी सांगितले की, चालू असलेला हा नाम महोत्सव संत निवृत्तीनाथ दादा संत ज्ञानेश्वर माऊली संत सोपान काका व संत आईसाहेब मुक्ताई यांच्या समाधी सोहळ्याच्या सप्तशतुकत्तर रोपे महोत्सवी वर्षाच्या सांगते च्या निमित्ताने कल सप्ताह म्हणून होत आहे या कार्यक्रमाचा आज काल्याच्या कीर्तनाने समारोप जरी होत असला तरी सुद्धा वारकऱ्यांच्या दृष्टीने हे महत्त्वाचा आहे हे खऱ्या हे खरंच आहे पण हा समारोप म्हणजे संतांच्या बद्दल असलेल्या भक्तीचा श्रद्धेचा समारोप नाही संतान प्रति आपली श्रद्धा आणि भावना जोपर्यंत आपल्या प्राणात प्राण आहे तोपर्यंत ती कायम ठेवत राहणार हे निश्चित आपण आदिशक्ती मुक्ताई च्या दरबारात आहोत या चारही भावंडांचं महत्त्व महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या निर्माण करिता आणि संस्कृतीच्या रक्षणाकरिता किती महत्त्वपूर्ण आहे हे संबंध महाराष्ट्राला ठाऊक आहे या संबंधातला वेगळा विचार करण्याचा कारण नाही कारण त्यांचा अधिकार आणि स्वरूप काय या संबंधात पुष्कळ मंथन झालंय त्यांचं अवताराला येणं आणि समाधीस्थ राहणं हे आपल्या कल्याणाकरिता आहे संतांचा अवतार केवळ सुखाकरिता आहे भगवान दयावंत आणि कृपावंत आहेत पण दया आणि कृपा यांच्यात एक भलं मोठा अंतर आहे दया म्हणजे दुःखाची निवृत्ती आणि कृपा म्हणजे सुख आहे. म्हणून ही चारही भावंड भगवंताची कृपा आहे या जगात फक्त आनंद आणि आनंद देण्याकरताच या चारही भावंडांचा अवतार आहे भगवंतांची 22 प्रकारच्या कृपा आहे आणि ही कृपा संतांच्याच रूपाने प्रकट झाली आहे जसे की चारही भावंड, तुकोबाराय, समर्थ रामदास स्वामी, चोखोबा, गोरोबा काका, जनाबाई, बंका महाराज, नामदेव महाराज असे अनेक संत हे भगवंताच्या कृपा स्वरूपच आहेत.भगवंताच्या अनेक कृपा असतील तर संतही अनंत आहे यातून भगवंताची सगळ्यात मोठी कृपा झाली, त्याला “शक्ती चक्रवर्तीनी कृपा” असे म्हणतात. भगवंताच्या पुढे जाणारी व भगवंताच्या स्वरूपाला तिरोहित करणारी जी कृपा आहे तिला शक्ती चक्रवर्तीने कृपा म्हणतात. आणि हीच कृपा आईसाहेब मुक्ताईच्या रूपाने प्रकट झाली म्हणून आई साहेबांना आदिशक्ती म्हटले जाते आद्य देवाची जननी माता असलेली ही मुक्ताबाई आहे आणि हीच भगवंताची कृपा ही शक्तीच्या रूपाने प्रकट झाली. अशाप्रकारे अनेक दाखले आणि दृष्टांत देत त्यांनी काल्याच्या कीर्तनातील अभंगाची उकल केली व आईसाहेब मुक्ताई चरणी दृढ भक्ती भाव ठेवून सेवा करा आणि यामुळे आईसाहेबांची कृपा तुम्हा आम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही असे त्यांनी सांगितले.तसेच दैनंदिन जीवन शैलीत दररोज ज्ञानेश्वरी पारायण (मग ५ ओव्या का होईना ) करावे कारण यांच्या व्यतिरिक्त आपल्याला तारणारे कोणीच नाही असेही कळकळीचे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.काल्याच्या किर्तनाची सांगता झालेनंतर ह. भ. प. चैतन्य महाराज देगलुकर यांचा संत मुक्ताबाई संस्थान चे अध्यक्ष ॲड.रवींद्र पाटील यांनी सत्कार केला. तर कार्यक्रमाला विशेष भेट देण्यासाठी देवुळगाव राजा संस्थान चे मोहननाथ महाराज, आळंदी श्रीमंत माऊली प्रतिष्ठानचे श्री.सबनीस , श्री पांडुरंग परमात्मा पालखी सोहळा प्रमुख सूर्यकांत भिसे, अंजाळे संस्थान गादीपती धनंजय महाराज, शशी काटे संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र हरणे महाराज , उद्धव महाराज , संदीप पाटील, उपस्थित होते.तसेच संत मुक्ताईचे विश्वस्त तसेच फडावरील सर्व किर्तनकार, टाळकरी फडकरी तसेच हजारो भाविक व श्रोते उपस्थित होते. काल्याच्या कीर्तनानंतर हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.