उद्या घटस्थापनेला आदिशक्ती श्री संत मुक्ताई साहेबांचा जन्मोत्सव सोहळा श्री स्वामी समर्थ सेवेकरी करणार सामुहिक दुर्गा सप्तशती पारायणाने जन्मोत्सव साजरा
मुक्ताईनगर : अश्विन शुद्ध प्रतिपदा घटस्थापना स्थापना हा दिवस श्री महाकाली , महालक्ष्मी महासरस्वती या आदिशक्ती स्वरूपाचे साडेतीन शक्ती पीठे येथे महाशक्ती ची आराधना व भक्ती करण्याचा उत्सव असतो.यासह हा उत्सव आदिशक्ती संत मुक्ताई यांच्याशी जोडला आहे.
“कडाडली निरंजनी जेव्हा,मुक्ताई गुप्त झाली तेव्हा।।”
या निळोबाराय यांच्या अभंगाप्रमाणे आदिशक्ती मुक्ताई देखील या शक्तीच्या अवतार आहेत अशी तमाम वारकरी व भाविकांत प्रचंड श्रद्धा आहे.नव्हे नव्हे आजही अनेक भाविकांना व वारकऱ्यांना याची प्रचिती येत असते.बीड जिल्हा वासीयांना तर मुक्ताई पालखीचा विरह होत असतो मूर्तिमंत उदाहरण आहे. या ठिकाणी आईसाहेब मुक्ताई च्या दरबारात दिंडोरी प्रणित , श्री स्वामी समर्थ केंद्र , मुक्ताईनगर व तालुका पुरुष व महिला सेवेकऱ्यांतर्फ परम पूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या आशिर्वादाने अब्जचण्डि सेवे अंतर्गत एकदिवसीय सामूहिक श्री दुर्गा सप्तशती पारायण करण्यात येवुन संत मुक्ताईंचा जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यासाठी सेवेकऱ्यांनी व मुक्ताई वर श्रद्धा असलेल्या भाविकांनी सेवेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
आदीशक्ती मुक्ताई जन्मोस्तव सोहळा*🚩
आदिशक्ती मुक्ताई प्रगट दिवस *🚩
*दि.२६/०९/२०२२ वार सोमवार (अश्विन शुद्ध प्रतिपदा घटस्थापना)
वेळ : – सकाळी १० – ०० वा*
स्थान : – संत मुक्ताई मंदिर गाभारा (जुने) कोथळी,मुक्ताईनगर*
येताना सोबत : – आसन,नित्यसेवा, दुर्गा सप्तशती ग्रंथ,हळद,कुंकू फुले, संकल्पासाठी थोडेसे तांदूळ, पाण्याची बॉटल,जपमाळ आणावी.*
ज्याच्या कडे ग्रंथ नसेल त्याना जागेवर ग्रंथ उपलब्ध केला जाईल.*
असे आवाहन सर्व तापी पूर्णा परिसर सेवा केंद्र (दिंडोरी प्रणित) मुक्ताईनगर यांच्यातर्फे करण्यात आले आहे. *
*श्री स्वामी समर्थ*🙏🚩
—————————————————————
आदिशक्ती मुक्ताईच्या समाधी सोहळ्याप्रमाणेच*
जन्मोत्सव देखील साजरा करावा !
आदिशक्ती मुक्ताई या संत असून देवदेखील आहेत. यामुळे त्यांच्या पुण्यतिथीसोबतच त्यांचा जन्मोत्सव देखील साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने अश्वीन शुध्द प्रतिपदा अर्थात नवरात्रीच्या प्रारंभापासून संत मुक्ताई जन्मोत्सव सोहळा सुरू होत असून सर्व भाविकांनी याला वैयक्तीक आणि सामूहिक पातळीवर साजरा करावा ! असे आवाहन संत मुक्ताई देवस्थानचे व्यवस्थापक हभप रवींद्र महाराज हरणे यांनी केले आहे.