Wednesday, June 18, 2025
Muktai Varta
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Muktai Varta
No Result
View All Result

आ. चंद्रकांत पाटलांच्या प्रयत्नांनी, मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रात 2515 अंतर्गत रू.6 कोटी निधी मंजुर

Admin by Admin
September 28, 2024
in जळगाव
0
आ. चंद्रकांत पाटलांच्या प्रयत्नांनी,  मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रात 2515 अंतर्गत रू.6 कोटी निधी मंजुर
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आ. चंद्रकांत पाटलांच्या प्रयत्नांनी,

मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रात 2515 अंतर्गत रू.6 कोटी निधी मंजुर

 

*मुक्ताईनगर मतदार संघातील ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधांसाठी व विकास कामांना निधी मंजूर*

 

 

मुक्ताईनगर प्रतिनिधी :-

 

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघासाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षातील तरतुदीतून आमदार चंद्रकांत पाटील यांनी शासन दरबारी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी (लेखाशीर्ष 2515 1238) या योजनेअंतर्गत विकास कामांना मंजुरी देण्यात आली असून, याबाबतचा महाराष्ट्र शासनाचा ग्रामविकास व पंचायत राज विभागामार्फत शासन निर्णय क्रमांक विकास-2024/प्र.क्र.168/ भाग-3/योजना-6 दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी मंजूर झालेला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुक्ताईनगर मतदारसंघातील गावांतर्गत मूलभूत सुविधांच्या कामांसाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्या अनुषंगाने आमदार पाटील यांनी सुचवलेल्या मतदार संघातील गावांतर्गत मूलभूत सुविधांच्या कामासंदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात आले असून, सदर शासन निर्णय सन 2024-25 या आर्थिक वर्षातील तरतुदीतून मतदार संघातील विकास कामांसाठी एकूण 6 कोटी रुपये इतक्या रकमेच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तसेच सदर निर्णयाच्या अनुषंगाने व सार्वजनिक बांधकाम विभागांना निधी वितरणासाठी मंजूर कामांचा निधी एलपीआरएस प्रणाली द्वारे वितरित करण्यात येणार आहे.

 

*मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघासाठी मंजूर झालेली कामे खालील प्रमाणे:-*

 

मौजे जुनोना येथे संत बाळू मामा मंदिरासमोर सभामंडप बांधणे ता.बोदवड (१० लक्ष)

मौजे मनुर खुर्द येथे श्री हनुमान मंदिरासमोर सभामंडप बांधणे ता.बोदवड (१० लक्ष)

मौजे करंजी येथे विठ्ठल मंदिरासमोर सभामंडप बांधणे ता.बोदवड (१५ लक्ष)

मौजे नाडगाव येथे गावांतर्गत कॉंक्रीटीकरण करणे ता.बोदवड (१० लक्ष)

मौजे रेवती विठ्ठल मंदिरासमोर सभामंडप बांधणे ता.बोदवड (१० लक्ष)

मौजे भानखेडा येथे लक्ष्मण नगरमध्ये डांबरीकरण करणे ता.बोदवड (१० लक्ष)

मौजे मनुर बु येथे अंतर्गत रस्ता डांबरीकरण करणे ता.बोदवड (१८ लक्ष)

मौजे येवती अंबऋशी मंदिराकडे जाणारा रस्ता डांबरीकरण करणे ता.बोदवड (१० लक्ष)

मौजे नांदगाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक सभागृह बांधकाम करणे ता. बोदवड (१० लक्ष)

मौजे चिखली बु. येथे श्री हनुमान मंदिरासमोर सभामंडप बांधणे ताबोदवड (१० लक्ष)

मौजे तरोडा येथे रस्ता कॉंक्रीटीकरण करणे ता.मुक्ताईननगर (१० लक्ष)

मौजे शेलवड येथे प्रभाग क्र. १ शौचालय बांधकाम करणे ता.बोदवड (५ लक्ष)

मौजे भोटा येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळयाजवळ सुशोभिकरण करणे ता.मुक्ताईनगर (१० लक्ष)

मौजे सुदगाव येथे गटार बांधकाम करणे व रस्ता कॉंक्रीटीकरण करणे ता.रावेर (१० लक्ष)

मौजे मस्कावद सिम येथे गावांतर्गत कॉंक्रीटीकरण करणे ता.रावेर (१० लक्ष)

मौजे गोलवाडे येथे श्री हनुमान मंदिराजवळ सामाजिक सभागृह बांधकाम करणे ता.रावेर (१० लक्ष)

मौजे पुरी येथे सामाजिक सभागृह बांधकाम करणे ता.रावेर (१० लक्ष)

मौजे सातोड येथे सामाजिक सभागृह बांधकाम करणे ता.मुक्ताईनगर (१० लक्ष)

मौजे तांदलवाडी येथे पेव्हरब्लॉक बसविणे ता.रावेर (१० लक्ष)

मौजे मांगलवाडी येथे गावांतर्गत कॉंक्रीटीकरण करणे ता.रावेर (१० लक्ष)

मौजे निंबोल येथे गावांतर्गत रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (२९ लक्ष)

मौजे कोळोदा येथे विठ्ठल मंदिराजवळ सभामंडप बांधकाम करणे ता.रावेर (१० लक्ष)

मौजे शिंगाडी येथे गावांतर्गत डांबरीकरण करणे ता.रावेर (१० लक्ष)

मौजे रेंभोटा येथे विठ्ठल मंदिराजवळ सभामंडप बांधकाम करणे ता.रावेर (२० लक्ष)

मौजे वाघाडी येथे पेव्हर ब्लॉक बसविणे ता.रावेर (१० लक्ष)

निमखेडी खु.गट क्र.132 ला संरक्षण भिंत बांधकाम करणे ता.मुक्ताईनगर (१० लक्ष)

मौजे खिर्डी बु. रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे.रावेर (२९ लक्ष)

वाघोदा बु.येथे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे.रावेर (२९ लक्ष)

ढोरमाळ येथे रस्ता कॉंक्रीटीकरण करणे ता.मुक्ताईनगर (१० लक्ष)

वाघोदा बु. येथे चंदन महाजन ते राजाराम हिरामण महाजन यांच्या घरापर्यंत पेव्हरब्लॉक बसविणे ता.रावेर (१० लक्ष)

मौजे पिंप्रीपंचम येथे सभामंडप उभारणे ता.मुक्ताईनगर (१० लक्ष)

मौजे मानेगाव ता.मुक्ताईनगर येथे रस्ता कॉंक्रीटीकरण करणे ता.मुक्ताईनगर (१० लक्ष)

तालखेडा येथे रस्ता कॉंक्रीटीकरण करणे ता.मुक्ताईनगर(१० लक्ष)

मौजे वाघोदा बु.येथे गट नं.३०१/अ या खुल्या जागेत सामाजिक सभागृह बांधकाम करणे ता.रावेर(२० लक्ष)

मौजे खिर्डी खु.शादिखाना हॉल बांधकाम करणे ता.रावेर(२० लक्ष)

मौजे कुऱ्हा हरदो येथे शिवव्दारा जवळ सुशोभीकरण करणे ता.बोदवड(१० लक्ष)

मौजे वढोदा येथे बुद्धविहार बांधकाम करणे ता.मुक्ताईनगर  (१० लक्ष)

मौजे दुई येथे बुद्धविहार बांधकाम करणे ता.मुक्ताईनगर(१० लक्ष)

मौजे मुंढोळदे (खडकाचे) नविन गावठाणात रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे ता.मुक्ताईनगर(१० लक्ष)

मौजे हलखेडा येथे श्री बाळूमामा मंदिराजवळ सभागृह बांधकाम करणे ता.मुक्ताईनगर (१० लक्ष)

मौजे शेमळदे येथे ता(विनोद पाटील ते संजय पाटील ) रस्ता कॉंक्रीटीकरण करणे मुक्ताईनगर(१० लक्ष)

मेंढोळदे येथे रस्ता कॉंक्रीटीकरण करणे ता.मुक्ताईनगर(१० लक्ष)

रुईखेडा येथे रस्ता कॉंक्रीटीकरण करणे ता.मुक्ताईनगर(१० लक्ष)

आंदलवाडी येथे रस्ता कॉंक्रीटीकरण करणे ता.मुक्ताईनगर(१० लक्ष)

मौजे मस्कावद बु येथे रस्ता कॉंक्रीटीकरण करणे व गटार बांधकाम करणे ता.रावेर  (१५ लक्ष)

मौजे मांगी येथे स्मशानभूमी बांधकाम करणे ता.रावेर(१० लक्ष)

मौजे नायगाव येथे रस्ता कॉंक्रीटीकरण करणे ता.मुक्ताईनगर(१० लक्ष)

मौजे येवती येथे सामाजिक सभागृह बांधकाम करणे ता.मुक्ताईनगर (२० लक्ष)

मौजे एनगाव बुद्धविहार बांधकाम करणे ता.बोदवड (१० लक्ष)

Tags: Jalgaon NewsLatest Marathi NewsMLA Chandrakant Bhau PatilMLA Chandrakant PatilMLA chandubhau patil newsMuktai vartaMuktai varta newsMuktainagar Newsआमदार चंद्रकांत पाटीलमुक्ताई वार्तामुक्ताईनगर
Previous Post

संत मुक्ताई दरबारात, संजय महाराज पाचपोर यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न !

Next Post

3 ऑक्टोंबर रोजी घटस्थापना दिनी, श्री.संत मुक्ताई जन्मोत्सव 

Admin

Admin

Next Post
3 ऑक्टोंबर रोजी घटस्थापना दिनी, श्री.संत मुक्ताई जन्मोत्सव 

3 ऑक्टोंबर रोजी घटस्थापना दिनी, श्री.संत मुक्ताई जन्मोत्सव 

संपादक : संतोष सुपडू मराठे

वार्ता संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group