आमदार चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षेखाली, कृषी(आत्मा) विभागातर्फे,
CMV व्हायरस संदर्भात शेतकरी प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिर खामखेडा येथे संपन्न
मुक्ताईनगर : खामखेडा ता. मुक्ताईनगर येथे दि. 04/09/2022 रोजी आजादी का अमृत महोत्सव निमित्ताने महाराष्ट्र शासन ,कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थान यंत्रणा (आत्मा) कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कौशल्य आधारित शेतकरी प्रशिक्षण केळी उत्पादक शेतकऱ्यांकरिता निर्यातक्षम केळी व CMV व्हायरस संदर्भात बऱ्हाणपूर रस्त्याने खामखेडा जवळ अशोक बळीराम पाटील यांच्या शेतात मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. सदर प्रशिक्षणात देसाई फ्रूट एक्सपोर्ट कंपनी चे प्रतिनिधी यांनी शेतकऱ्यांना निर्यातक्षम केळी उत्पादन तंत्र व निर्यातीचे निकष शेतकऱ्यांना सांगितले व बड इंजेक्शन व सर्टिंग बॅग च्या वापराचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना करून दाखवले.
कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. महेश महाजन यांनी CMV व्हायरस नियंत्रणा बाबत व धीरज नेहेते यांनी केळी पिकावरील जिवाणू व विषाणू जन्य रोगाबाबत सविस्तर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी अभिनव माळी यांनी शेतकऱ्यांना PMFME, GI मानांकन, होर्टनेट ट्रेसेबिलिटी, PMKISAN E-KYC,कीटकनाशक फवारणी करतांना घ्यावयाची काळजी, असे अनेक कृषी विभगाच्या योजनांची माहिती शेतकऱ्यांना दिली. या वेळी माननीय आमदार चंद्रकांत पाटील, खामखेडा गावचे सरपंच पुंडलिक तायडे, उपसरपंच भागवत पाटील, प्रभाकर पाटील, दिलीप पाटील सर, योगेश पाटील, भास्कर पाटील, छोटू पाटील, विनोद पाटील , महेंद्र मोंढाळे, नवनीत पाटील, गोविंदा पाटील, विकास पाटील, प्रशांत पाटील, कैलास पाटील, अतुल चौधरी, मोहन पाटील, अरुण पाटील , निलेश पाटील , लक्ष्मण पाटील , प्रकाश वाघ , सुभाष वाघ, भावजी पाटील, शांताराम गवते , बाळू पाटील तसेच गावातील सर्व शेतकरी व कृषी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.