आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांनी बोदवड शहरातील विविध विकासकामांसाठी 2 कोटी 77 लाख रुपयांचा निधी मंजूर !
संत जगनाडे महाराज सांस्कृतिक सभागृहासाठी 50 लाख रुपयेे.
बोदवड:-
शहरातील विविध विकास कामांसाठी आमदार चंद्रकांतभाऊ पाटिल यांचा मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेब यांच्याकडील सततच्या पाठपुराव्यामूळे 2 कोटी 77 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यात प्रामुख्याने संत जगनाडे महाराज सांस्कृतिक सभागृह बांधकाम करणेसाठी 50 लक्ष रुपयांचा निधी नव्याने मंजूर झाला आहे. गत महिन्यांत ग्रामविकास विभागाकडून नगरपंचायत हद्दीत याच सभागृहासाठी निधी मंजूर झाला होता. परंतु , नगरपंचायतींच्या विकासकामांसाठी नगरविकास खाते वेगळे असल्याने हा अडचणीचा विषय झाल्याने हा निधी रद्द झाला होता. त्यामुळे आता परत आमदार चंद्रकांतभाऊ पाटिल यांच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेब यांनी नगरविकास खात्याच्या माध्यमातून संत जगनाडे महाराज सांस्कृतिक सभागृह बांधकाम करणेसाठी 50 लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला आहे. शहरात बहुसंख्येने असलेल्या तेली समाजाच्या सभागृहासाठी भरीव निधी ऊपलब्ध झाला आहे.
, संत सेना महाराज सभागृहास संरक्षण भिंत बांधकाम करणे 30 लक्ष , प्रभाग क्रमांक 1 मध्ये रस्ता कॉंक्रिटीकरण 20 लक्ष , प्रभाग क्रमांक 5 मध्ये रस्ता काँक्रिटीकरण 20 लक्ष, प्रभाग क्रमांक 6 मध्ये रस्ता कॉंक्रिटीकरण करणे 20 लक्ष, प्रभाग क्रमांक 9 मध्ये रस्ता काँक्रिटीकरण करणे 20 लक्ष , प्रभाग क्रमांक 10 मध्ये रस्ता काँक्रिटीकरण करणे 20 लक्ष , प्रभाग क्रमांक 11 मध्ये रस्ता कॉंक्रिटीकरण करणे 20 लक्ष, प्रभाग क्रमांक 12 मध्ये रस्ता काँक्रिटीकरण करणे 20 लक्ष , प्रभाग क्रमांक १३ मध्ये रस्ता काँक्रिटीकरण करणे 20 लक्ष , प्रभाग क्रमांक 16 मध्ये रस्ता कॉंक्रिटींग करणे 20 लक्ष , प्रभाग क्रमांक 17 मध्ये रस्ता कॉंक्रिटीकरण करणे 17 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.