आमदार चंद्रकांत पाटील ठरले बाहुबली !
मौजे मुंढोळदे (खडकाचे) ते सुलवाडी- ऐनपुर मोठ्या पुलाच्या बांधकामास 175 कोटी रु.निधी सह मंजुरी !
मुंबई : मौजे मुंढोळदे (खडकाचे) इजिमा-28 ता. मुक्ताईनगर ते सुलवाडी- ऐनपुर (ग्रामा-8) ता. रावेर या ठिकाणावरून दोन तालुक्यांना जोडणाऱ्या रस्त्यावर तापी नदीवर मुंढोळदे (खडकाचे) गावाजवळ मोठ्या पुलाचे बांधकाम करणे ता. मुक्ताईनगर जि. जळगाव या कामास सुमारे 175 कोटी रूपये निधीसह अर्थसंकल्प 2023 मध्ये मंजुरी मिळालेली असून यामुळे माझ्या शेतकरी राजा व जनतेला दूरचे अंतर सुलभ होईल व शेती मालाची फरफट थांबणार आहे. अशी माहिती आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली.
मुक्ताईनगर मतदार संघातील रावेर आणि मुक्ताईनगर तालुक्यातील केळी उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर असल्याने येथे होत असलेली केळी वाहतूक लांब पल्ल्याने करावी लागते त्यामुळे शेतकऱ्यांना वाहतुकीचा मोठा भुर्दंड सोसावा लागतो. परंतु हतनूर धरणाचे बॅक वाटर मुळे तापी नदी पात्रात येथे मोठ्या प्रमाणावर पाणी साठलेले असते. तसेच या ठिकाणी पुलाचे काम मंजूर झाल्यास मुक्ताईनगर व रावेर तालुक्याला जोडणारा व कमी अंतरांचा महत्वाचा प्रकल्प ठरणार आहे. अशी मागणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी शासन दरबारी लावून धरलेली होती यासाठी त्यांचा सतत पाठपुरावा सुरू होता , तर माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आमदार पाटील यांना डीवचत पूल मंजूर केल्यास सत्कार करू अशी वल्गना केली होती . पाठोपाठ त्याच्या कन्या रोहिणी खडसे यांनी देखील भाषणाच्या ओघात सत्कार करण्याचे म्हटले होते याच अनुषंगाने आता पूल मंजूर झालेला असून दोघे पिता पुत्री आमदार चंद्रकांत पाटील यांचा सत्कार करणार का अशी चर्चा सोशल मीडियावर रंगलेली असून तसे औदार्य दाखवतील अशी चर्चा देखील सर्व सामान्य जनतेत सुरू आहे.
दरम्यान ,
आमदार चंद्रकांत पाटील पाटील हे शिंदे फडणवीस सरकार मधील बाहुबली आमदार ठरलेले असून सरकार स्थापन झाल्यापासून करोडो रुपयांचा निधी मतदार संघासाठी उपलब्ध होत आहे त्यातच वारकरी संप्रदायासाठी श्रद्धेचा विषय असलेल्या संत मुक्ताई मंदिरासाठी नुकतीच त्यांनी 15 कोटी रु निधी , मागील आठवड्यात मुक्ताईनगर , सावदा व बोदवड पाणीपुरवठा योजनांसाठी करोडो रू निधी सह मंजुरी आणलेली असून सर्वात मोठी उपलब्ध असेल तर MIDC ची 625 एकर जमीन क्षेत्रावर मंजुरी व पाहिला टप्पा 100 एकर जमीन क्षेत्र संपादीत करण्याचे मागील महिन्यात मंजुरी घेतलेली आहे आणि न भूतो न भविष्यति असा सुलवाडी ते मुंढोळदे (खडकाचे) हा पूल मंजूर झाल्याने शेतकऱ्यांना शेती माल वाहतुकीसह दोन तालुके जवळ येणार आहे.