आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धा संपन्न !
सौ.यामिनीताई पाटील यांनी झेंडी दाखवून केली स्पर्धेला सुरुवात !
मुक्ताईनगर : मुक्ताईनगर चे भाग्यविधाते ,दमदार कार्यसम्राट आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी १३ सप्टेंबर रोजी भव्य मॅरेथॉन स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. स्पर्धेची सुरुवात आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सौभाग्यवती सौ. यामिनीताई पाटील, कन्या कु. संजनाताई पाटील यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आली. स्पर्धेत ५ किमी ची धाव घेवून सर्व प्रथम आलेल्या प्रथम द्वितीय व तृतीय स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे व ट्रॉफी तसेच इतर ७ स्पर्धेतील विजेत्यांना उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून मेडल व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. स्पर्धेचे आयोजन सिद्ध करियर पॉईंट , मुक्ताईनगर यांचेतर्फे करण्यात आले होते.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई, विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटील, शहर प्रमुख गणेश टोंगे ,उपतालुकाप्रमुख प्रफुल्ल पाटील, शहर संघटक वसंत भलभले, गटनेता राजेंद्र हिवराळे, निलेश शिरसाट, नगरसेवक मुकेश वानखेडे, संतोष मराठे, आरिफ आझाद, युनूस खान, नुरमोहम्मद खान,नगरसेविका सविता भलभले, महीला आघाडी चे कल्पना पालवे, सरिता कोळी यांचेसह संतोष माळी , सचिन पाटील, नंदन सानप, भैय्या भालशंकर आदींची उपस्थिती होती
असे होते पारितोषिक :-
प्रथम बक्षीस ११ हजार रू. व ट्रॉफी (प्रवीण चौधरी , मुकेशचंद्र वानखेडे,नगरसेवक) , द्वितीय बक्षीस – ५००० रू. व ट्रॉफी(छोटू भोई ,शिवसेना तालुका प्रमुख) तृतीय बक्षीस – ५००० रू. व ट्रॉफी(राजेंद्र हिवराळे,नगरसेवक तथा गटनेता) तर इतर उत्तेजनार्थ विजेत्यांना मेडल व प्रमाणपत्र अशा स्वरूपात बक्षिसांचे नियोजन करण्यात आले होते
—————————— —————————— —
यांचे सहकार्याने :
नगरसेवक संतोष मराठे, सचिन (पिंटू) पाटील, स्वप्नील श्रीखंडे, जितेंद्र भोलाने, अवी अडकमोल, धीरज जावरे, सागर सनांसे, राहुल सनांसे, घनश्याम भोई, दीपक मोरे ,आनंद मराठे, साहिल इंगळे आदींचे अनमोल सहकार्याने ही भव्य स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली.
—————————— —————————— —–
हे घेतले अथक परिश्रम :
सिद्ध करियर पॉईंट , मुक्ताईनगर चे अध्यक्ष सुहास जाधव, निखिल यमनेरे,आकाश तायडे , राहुल बोदडे, हेमराज सपकाळे यांनी अथक परिश्रम घेतले.