आदिशक्ति संत मुक्ताई यांच्या (कोथळी) मुक्ताईनगर येथील मंदिरासाठी 2.50 कोटी निधीची तरतूद
आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पाठपराव्याला यश
मुक्ताईनगर : लाखो, करोडो वारकरी व भाविकांचे श्रद्धास्थान असलेले आदिशक्ती श्री संत मुक्ताई यांचे तीर्थक्षेत्र कोथळी, मुक्ताईनगर येथील मंदिराचे बांधकाम साठी तत्कालीन वेळेस 9.8 कोटी रुपये मंजूर आहेत यापैकी येथे उभे राहिलेल्या बांधकामासाठी 4 कोटी रुपये खर्च झालेले असून गेल्या 18 महिन्यांपासून अपूर्ण निधी अभावी मंदिराचे बांधकाम रखडलेले होते. दीर्घ काळापासून येथील अपूर्ण कामामुळे येथे भाविक व वारकऱ्यांना प्रचंड अडचणी येत होत्या, त्यामुळे मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी दि. 24 ऑगस्ट 2022 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे लेखी पत्राद्वारे उर्वरित 5.8 कोटी रुपये निधी ची तरतूद या बांधकामासाठी करण्यात यावी अशी लेखी मागणी केली होती. यानुसार आज दिनांक २ डिसेंबर २०२२ रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री फडणवीस यांच्या आदेशाने 2.50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून उर्वरित निधीची तरतूद लवकरच करण्यात येणार आहे अशी माहिती आमदारांचे स्विय सहायक प्रवीण चौधरी यांनी दिली.