“अर्थसंकल्प 2023” काळात आमदार चंद्रकांत पाटील ठरले बाहुबली , मुक्ताईनगर मतदार संघासाठी 250 कोटी निधीची तरतूद करण्यास यश
आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याने अर्थसंकल्प २०२३ अंतर्गत मुक्ताईनगर मतदार संघातील रावेर , मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यातील अनेक गावांना जोडणारे जिल्हा परिषदे अंतर्गतचे रस्ते तसेच राज्य व जिल्हा मार्ग आणि ग्रामीण मार्ग यासाठी सुमारे 75 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे तसेच सुलवाडी ते मुंढोळदे तापी नदीवरील पुलासाठी 175 कोटी मंजूर झालेले असून एकूण 250 कोटी रुपयांचा बलाढ्य निधी मतदार संघात खेचून आणण्यात आमदार चंद्रकांत पाटील यांना प्रचंड यश प्राप्त झालेले असून यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेल्या पाठपुरावा इतक्या मोठ्या प्रमाणावर निधी मतदार संघासाठी प्राप्त झालेला आहे.त्यामुळे बाहुबली आमदार ठरलेले आहेत.
75 कोटी रुपयांची तरतूद रस्त्यांसाठी :
अंतुर्ली ते वारूळी रस्ता, लालगोटा ते तालखेडा रस्ता चारठाणे ते भवानी मंदिर रस्ता दरोडा ते पिंप्री अकराऊत रस्ता निमखेडी ते ढोरमाळ रस्ता धामणगाव ते मोर्जिरा रस्ता नव्हे तालखेडा ते जुने तालखेडा रस्ता बोदवड ते थेरोडा रस्ता तरोडा ते तिघे जिल्हाहद्द रस्ता, धाबे ते कोठा रस्ता, निमखेडी ते चारठाणा रस्ता चांगदेव ते मानेगाव रस्ता चिखली ते चिचखेड रस्ता मनोर बुद्रुक ते राजुर रस्ता मानमोडी ते विचार रस्ता उजनी रस्ता शेवगे ते कुऱ्हा हरदो रस्ता , नाडगाव ते सोनोटी रस्ता, सोनोटी ते बोदवड रस्ता , कुऱ्हा हरदो ते लोनवाडी रस्ता, बलवाडी पुरी भामलवाडी खिर्डी विवरे खु गटार बांधकाम करणे,
दुसखेडा थोरगव्हण , मस्कावद निंभोरा खिर्डी गटार बांधकाम करणे, शिंगाडी ते धामोडी रस्ता, तांदलवाडी ते मांगलवाडी रस्ता, कोचुर ते मस्कावद रस्ता, मस्कावद बू ते वाघोदा रस्ता चूनवाडे ते मांगी रस्ता , दसनुर वाघोदा रस्ता , शिंगाडी ते भामलवाडी रस्ता निंबोल रस्ता, विटवा रस्ता या प्रमुख रस्त्यांसह इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण रस्त्यांसाठी सुमारे ७५ कोटी रुपयांच्या जवळपास निधीची तरतूद झालेली असून यापैकी असंख्य रस्ते शेती शिवारातील जात असल्याने केळी उत्पादक शेतकरी बांधवांना या मंजूर झालेल्या रस्त्यामुळे खूप मोठा दिलासा मिळणार आहे .
आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांना प्रचंड यश…
रावेर पातोंडी ते नायगाव वढोदा रस्ता काँक्रीटीकरण मंजुरी दिशेने , सर्वेक्षण व प्रस्तावासाठी ४३.६३ लक्ष रू.निधीची तरतूद
मुंबई : आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांना प्रचंड यश , रावेर पातोंडी पिप्रीनांदू नायगाव डोलारखेडा कुन्हा वढोदा रस्ता रामा ४७ किमी ०/०० ते ६४/९०० ची सुधारणा करणे. (अंदाजित रक्कम ४५० कोटी रुपये) या रस्त्याच्या काँक्रीटीकरण बांधकामासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सतत पाठपुरावा सुरू होता.या पाठपुराव्याला यश आले असून अर्थसंकल्प २०२३ मध्ये या रस्त्याच्या सर्वेक्षण व प्रस्ताव तयार करण्यासाठी ४३ लक्ष ६३ हजार रुपयांची तरतूद करण्यात आलेली असून लवकरच आमदार चंद्रकांत पाटील यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या या रस्त्याचा मंजुरीचा देखील मार्ग मोकळा झालेला आहे.
Like this:
Like Loading...